Saturday, 26 November 2022

भारतीय संविधान दिन !!!

 

                       सौजन्य Google

संविधान दिन 

         नव्याने स्वतंत्र झालेल्या भारत देशाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ,सामाजिक,अर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करणारे , बंधूभाव जोपासणारे, व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारे, आणि राष्ट्राचे एकता व एकात्मतता राखणारे संविधान स्वीकारुन देशाने आपल्याला प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण होण्यास कटिबध्द केलं...

    आपल्या उदेश पत्रिकेची सूरवात "आम्ही भारताचे लोक" या पासून सुरू झाली आहे ... भारत देशातील सत्ता, अधिकारकेंद्र ही भारतीय नागरिकांच्या हातात आहे.. भारताचे नागरिकच भारताचे भाग्यविधाते आहेत. असा त्याचा अर्थ ध्वनित होतो.

           लोकशाही मूल्यं हीच भारताला पोषक आहेत याची खात्री घटनाकारांना होती.. सामाजिक विषमतेमुळे,मनुवर आधारलेल्या व्यवस्थेने समान संधी , माणूस म्हणून हक्क नाकारले होते..हेच कटू वास्तव स्वीकारुन लोकशाही वर आधारित लिखित संविधान स्वीकारुन प्रत्येक व्यक्तीला कायद्या पुढे समान बनवले..प्रत्येकाच्या हक्काचे रक्षण ,प्रत्येकाला समान संधी ची लिखित हमी दिली गेली... कायद्याचे राज्य , कायद्यापुढे समानता ही तत्व या भारत भूमीवर निनादु लागली.  

पार्श्वभूमी        

            2 वर्ष 11 महिने 18 दिवस असे सर्वसमावेशक असे संविधान निर्मितीसाठी लागले. संविधान निर्मिति साठी अनेक समित्या होत्या. त्यात मसुदा समिती सर्वात महत्वाची समिती होती.. याच समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.. त्यांना अनेक विद्वान जसे बी एन राव इ.सारख्याचे सहाय लाभले . बाबासाहेबांनी जगातील ५० हून अधिक संविधानाचा अभ्यास केला.. आणि आपल्या प्रज्ञेच्या,जोरावर जगातील सर्वश्रेष्ठ असे संविधान निर्मीत केले.

संविधान निर्मितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे . म्हणुनच त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हटले जाते .





संविधानातील तरतुदी 

मूलभूत अधिकार (न्याय प्रविष्ट ) , कायद्यामुळे समानता, विचार व अभिव्यकी स्वातंत्र्य, कल्याणकारी राज्य साठी मार्ग दर्शक तत्व , स्वतंत्र कायदेमंडळ, न्याय मंडळ. निर्माण करण्यात आले आहेत .

      कायदेमंडळ,न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ,आणि मीडिया ही लोकशाहीची आधार स्तम्भ आहेत.. लोकशाही च्या संवर्धनासाठी ही स्वतंत्र पणे काम करतील या साठी तरतूद केली आहे.

      लोकशाही म्हणजे फक्त बहुसंख्याकांच्या अधिकाराचे संरक्षण करत असून अल्पसंख्याकाना ही हक्काची ग्वाही ,आणि सुरक्षेची हमी देते.. अनेक धर्म,जात,पंथ,भाषा असलेल्या आपल्या देशात हे फक्त लोकशाही च्य तत्वाने च शक्य होऊ शकते . चेक अँड balance हा लोकशाही व्यवस्थेचा आकर्षक सिद्धांत आहे.. न्याय्य व्यवस्था आणि कार्यकारी यंत्रणा यांच्यामधे सुयोग्य सांगड घालण्यात आली आहे.


   लोकशाही मधील विरोधी पक्षाचे स्थान:

सरकार वर लोकप्रतिनिधी द्वारे नियत्रंण हे लोकशाहीचं मूलभूत वैशिष्ट आहे..विरोधी पक्ष हा सरकारला जाब विचारत असतो . एक प्रकारे संसदे तर्फे विरोधी पक्ष सरकार वर नियंत्रण ठेवत असते ..

लोकशाही मध्ये विरोधी मताच महत्व 

 "तुमचं विरोध मी माझ्या बुद्धीच्या जोरावर खोडून काढीन पण तुम्हाला तुमचा विरोध मांडता यावा यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावीन.." 

   व्हाल्टेअर फ्रेंच राजकीय तत्वंज्ञ (१६९४-१७९८)

   या वाक्याचा आधार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता . या वरून आपल्या लक्षात येईल की विरोधाला ही मान्य करण्याचं धाडस बाबासाहेबांनी, घटनाकारांनी दाखवले होते...मात्र आज आपण पाहतो की सत्ता मिळाली की विरोधाची गळचेपी करण्यासाठी यंत्रनेचा वापर केला जातो.. लोकशाही व्यवस्था प्रत्येकाला आपली जागा दाखवण्यास समर्थ आहे.. सत्तेचा उपयोग देशाच्या विकासासाठी, सर्वसमावेशक धोरण अमलात आण्यासाठी करावा. सत्ता मिळाल्यावर व्यक्तीचं खर रूप उघडकीस येत असते.. अमेरिकेच्या महान माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचं सुप्रसिद्ध वाक्य या प्रसंगी लागू पडते.

"Nearly all men can withstand adversity, but if you want to test a man’s character, give him power.” - 

व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तपासायचे असेल तर त्या व्यक्तीला सत्ता, अधिकार द्या. प्रत्येक गोष्टीची नागरिक नोंद ठेवत असतात.. मग सत्तांतर करणे हे पण आपल्या हातातच असते ..

   आज आपण संविधान दिनानिमित्त आपल्या संविधानाच रक्षण करणे ही आपली नैतिक जवाबदारी आहे असं मानून तिच्या संरक्षणासाठी कटिबध्द राहण्याची प्रतिज्ञा करूयात... कारण आपण भारताचे लोक भारताचे भाग्यविधाते आहोत...

प्रलय भारत सावंत

२६ नोव्हेंबर २०२२


Sunday, 6 November 2022

रक्तविरहित सामाजिकक्रांती घडवणाऱ्या विद्यार्थ्याचा विद्यार्थी दिन !!!

 




रक्तविरहित सामाजिकक्रांती घडवणाऱ्या विद्यार्थ्याचा विद्यार्थी दिन !!!

             ७ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासात महत्वाचा आहे. याच दिवशी एका तेजस्वी विद्यार्थ्याच भवितव्य ठरले.. आणि भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासातील नवे पर्व सुरू झाले. पुढें हाच विद्यार्थी भारताचा भाग्य विधाता ठरला..असा हा महान विदयार्थी म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर होय..७ नोव्हेंबर १९०० साली साताऱ्याच्या प्रतापसिंह शाळेत बाबासाहेबांचे नाव नोंदवले गेले..या निमित्ताने २०१७ पासून महाराष्ट्र शासनाने हा दिवस विध्यार्थी दिन म्हणुन साजरा करण्याचे ठरवले..


       शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

    - डॉ बाबासाहेब आंबेडकर

    शिक्षणाच्या , ज्ञानाच्या संपादनाने एखादी व्यक्ती राष्ट्रांच्या निर्मितीमध्ये भरीव योगदान कसे देऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतरत्न 

डॉ बाबासाहेब आंबेडकर होय..सामाजिक विषमतेमुळे, जातीभेदामुळे शाळेमध्ये अवहेलना सहन करावी लागत, वर्गात एका कोपऱ्यात बसावे लागत ,तरीही त्यांच्यातील शिक्षणाची ओढ कमी झाली नाही. शिक्षण घेऊन एक नवा आदर्श उभा केला.. परदेशी जाऊन उच्च विदयाविभूषित होऊन ज्या विषमतेने अवहेलना केली त्याच विषमतेचा कायमस्वरूपी इलाज केला. दलितांच्या, शोषितांच्या, स्त्रीयांच्या , शेतकऱ्याच्या,कामगारांच्या हक्कासाठी लढणारा मूकनायक ठरला... सर्वात जास्त वेळ अभ्यास ,१८ तासापेक्षा पण जास्त अभ्यास ,ग्रंथालयात सर्वात आधी आणि सर्वात शेवटी जाणारे विद्यार्थी असा विक्रम त्यांच्या नावावर आहे..अभ्यास करताना ते देहभान विसरून जात असत.. अर्थिक परिस्थिती बिकट असूनही पावाच्या मदतीने आपली भूक भागवली.. म्हणूनच त्यांना सिम्बॉल ऑफ नॉले म्हणुन गौरविण्यात आले आहे..




आजन्म विद्यार्थी 

   विविध विषयांवर पांडित्य मिळवून सुध्दा बाबासाहेब हे आजन्म विद्यार्थीच राहिले. त्यांची ज्ञानतृष्णा कधीही संपली नाही... बाबासाहेब ज्यामुळे घडले त्यामध्ये पुस्तकांचा मोलाचा वाटा आहे .ज्या वेळी समाज जातीय बंधनं लादू पाहत होता तेव्हा,पुस्तकांनी बाबासाहेबाना आपलेसे केले. पुस्तके बाबासाहेबांची घनिष्ट मित्र बनली... त्यामुळे त्यांनी पुस्तकांवर अफाट प्रेम केले.. पुढं याच पुस्तकाच्या मदतीने त्यांचं व्यक्तिमत्त्व बहरत गेले. एखाद पुस्तकं आपल्याला पुन्हा वाचायला मिळणार नाही असे समजून, ते पुस्तक पाहिल्या वेळेसच उत्तम रित्या वाचत असत . अशाप्रकारे त्यांचा ज्ञानाचा सागर विस्तारत गेला .

आपल्या बुद्धीचा वापर करून सामजिक क्रांती घडवून एक अमीट ठसा निर्माण केला .





ब्रेन आणि पेन यांचा वापर करून सर्वसमावेशक,सामाजिक ,आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करणारे, बंधुता जोपासणारे, आणि व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारे संविधान लिहून भारत देशाला उपकृत केले.. स्त्रीयांच्या हक्कासाठी हिंदु कोड बिल लिहून त्याना समानतेच्या पातळीवर आणले.. असा क्रांतीचा रथ पूढे आणत असताना त्यांना प्रचंड विरोध झाला.. विरोधाला न जुमानता सुधारणा घडवण्याच्या अट्टहास सोडला नाही . सामाजिक समतेचे गोड स्वप्न सत्यात आणले.

    त्यांच्या या जीवन प्रवासाकडे पाहताना त्यांचा संदेश सार्थ ठरतो

     "Life should be great than long".

अशा या बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व चकित करणाऱ्या ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏

-प्रलय भारत सावंत

७ नोव्हेंबर २०२२



महाड सत्याग्रह २० मार्च १९२७ !!

तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस, एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस ..  महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचल...