रक्तविरहित सामाजिकक्रांती घडवणाऱ्या विद्यार्थ्याचा विद्यार्थी दिन !!!
७ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासात महत्वाचा आहे. याच दिवशी एका तेजस्वी विद्यार्थ्याच भवितव्य ठरले.. आणि भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासातील नवे पर्व सुरू झाले. पुढें हाच विद्यार्थी भारताचा भाग्य विधाता ठरला..असा हा महान विदयार्थी म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर होय..७ नोव्हेंबर १९०० साली साताऱ्याच्या प्रतापसिंह शाळेत बाबासाहेबांचे नाव नोंदवले गेले..या निमित्ताने २०१७ पासून महाराष्ट्र शासनाने हा दिवस विध्यार्थी दिन म्हणुन साजरा करण्याचे ठरवले..
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
शिक्षणाच्या , ज्ञानाच्या संपादनाने एखादी व्यक्ती राष्ट्रांच्या निर्मितीमध्ये भरीव योगदान कसे देऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर होय..सामाजिक विषमतेमुळे, जातीभेदामुळे शाळेमध्ये अवहेलना सहन करावी लागत, वर्गात एका कोपऱ्यात बसावे लागत ,तरीही त्यांच्यातील शिक्षणाची ओढ कमी झाली नाही. शिक्षण घेऊन एक नवा आदर्श उभा केला.. परदेशी जाऊन उच्च विदयाविभूषित होऊन ज्या विषमतेने अवहेलना केली त्याच विषमतेचा कायमस्वरूपी इलाज केला. दलितांच्या, शोषितांच्या, स्त्रीयांच्या , शेतकऱ्याच्या,कामगारांच्या हक्कासाठी लढणारा मूकनायक ठरला... सर्वात जास्त वेळ अभ्यास ,१८ तासापेक्षा पण जास्त अभ्यास ,ग्रंथालयात सर्वात आधी आणि सर्वात शेवटी जाणारे विद्यार्थी असा विक्रम त्यांच्या नावावर आहे..अभ्यास करताना ते देहभान विसरून जात असत.. अर्थिक परिस्थिती बिकट असूनही पावाच्या मदतीने आपली भूक भागवली.. म्हणूनच त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणुन गौरविण्यात आले आहे..
आजन्म विद्यार्थी
विविध विषयांवर पांडित्य मिळवून सुध्दा बाबासाहेब हे आजन्म विद्यार्थीच राहिले. त्यांची ज्ञानतृष्णा कधीही संपली नाही... बाबासाहेब ज्यामुळे घडले त्यामध्ये पुस्तकांचा मोलाचा वाटा आहे .ज्या वेळी समाज जातीय बंधनं लादू पाहत होता तेव्हा,पुस्तकांनी बाबासाहेबाना आपलेसे केले. पुस्तके बाबासाहेबांची घनिष्ट मित्र बनली... त्यामुळे त्यांनी पुस्तकांवर अफाट प्रेम केले.. पुढं याच पुस्तकाच्या मदतीने त्यांचं व्यक्तिमत्त्व बहरत गेले. एखाद पुस्तकं आपल्याला पुन्हा वाचायला मिळणार नाही असे समजून, ते पुस्तक पाहिल्या वेळेसच उत्तम रित्या वाचत असत . अशाप्रकारे त्यांचा ज्ञानाचा सागर विस्तारत गेला .
आपल्या बुद्धीचा वापर करून सामजिक क्रांती घडवून एक अमीट ठसा निर्माण केला .
ब्रेन आणि पेन यांचा वापर करून सर्वसमावेशक,सामाजिक ,आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करणारे, बंधुता जोपासणारे, आणि व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारे संविधान लिहून भारत देशाला उपकृत केले.. स्त्रीयांच्या हक्कासाठी हिंदु कोड बिल लिहून त्याना समानतेच्या पातळीवर आणले.. असा क्रांतीचा रथ पूढे आणत असताना त्यांना प्रचंड विरोध झाला.. विरोधाला न जुमानता सुधारणा घडवण्याच्या अट्टहास सोडला नाही . सामाजिक समतेचे गोड स्वप्न सत्यात आणले.
त्यांच्या या जीवन प्रवासाकडे पाहताना त्यांचा संदेश सार्थ ठरतो
"Life should be great than long".
अशा या बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व चकित करणाऱ्या ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏
-प्रलय भारत सावंत
७ नोव्हेंबर २०२२



शब्दांचा प्रलय आणला आहे 👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏🙏😊
Deleteअप्रतिम...
ReplyDeleteThanks dada 🙏🙏🙏
DeleteNice
ReplyDeleteThank you sir🙏🙏🙏
Delete👍👌
ReplyDeleteThanks Raj 🙏🙏🙏
DeleteExcellent Pralay keep it up
ReplyDeleteThank you sir
Delete