तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस,
एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस..
महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचलित सामाजिक विषमतेला आव्हान देणारे आणि माणसाला माणूस म्हणून हक्क मिळवून देण्यासाठीचा सत्याग्रह होता. हा सत्याग्रह रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी २० मार्च १९२७ रोजी झाला.आणि महाड सामाजिक चळवळीच्या इतिहासात अजरामर झाले .
बाबासाहेबांना शाळेत असताना चंद्र व सूर्य या पेक्षा दूर पाण्यानी भरलेला मटका वाटत असे..कारण पाणी वाढणारे व्यक्ती जर शाळेत नाही आली.तर बाबासाहेबांना पिण्याच्या पाण्याला स्पर्श सुद्धा करण्यास मनाई होती. म्हणुनच आपली शिक्षण पूर्ण झाल्यावर , कायदे तज्ञ झाल्यावर सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी प्राशन करण्यासाठी लढा देण्याचे ठरवले.
निसर्ग जर कोणता भेदभाव करत नसेल तर आपण भेदभाव करणारे कोण ? असा परखड सवाल बाबासाहेबांनी केला. जगात असा हा एकमेव सत्याग्रह म्हणून महाड सत्याग्रहाची नोंद आहे. बाबासाहेबांनी नेतृत्व केलेल्या या लढ्याचे भारताच्या समतेच्या, लढ्यात महत्वाचे स्थान आहे. या सत्याग्रहानी समतेचे नवे पर्व सुरू झाले.
हजारो वर्ष जिथे ओंझळीभर पाणी पिण्यासाठी वाट पहावी लागली त्या ठिकाणी पाणी पिताना अनेकांच्या डोळ्यात पाणी नक्की आले असेल ! यामुळेच स्वतंत्र भारतात अशा प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून भारतीय राज्यघटनेत या हक्काचा मूलभूत हक्क म्हणून समावेश केला..
हा लढा समजल्यावर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १५,१६ ,१७ याचे महत्व समजते.. अनुच्छेद १५ सांगते की , सार्वजनिक ठिकाणी जात,धर्म, वंश, लिंग,किंवा जन्मस्थान या वरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे..,
१५ (२) कोणत्याही नागरिकाला दुकाने, हॉटेल्स, सार्वजनिक रेस्टॉरंट्स किंवा सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी प्रवेशापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही.
अनुच्छेद १६- सर्वांना नोकरीमध्ये समान संधीची हमी देते.सरकारी नोकऱ्यांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा निवासस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करते
अनुच्छेद १७ अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे.
असा हा मानव हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्याच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना विनम्र अभिवादन !!


मानव मुक्तीच्या लढ्याला त्रिवार वंदन. प्रलय तुझा लेख काळाची गरज आहे
ReplyDeleteधन्यवाद सर.🙏🙏🙏 माझ्या साठी आपले शब्द मोलाचे आहेत..
DeleteExcellent pralay Keep it up
ReplyDeleteThank you sir.. 🙏🙏🙏Your feedback always boosts my confidence
Delete