Tuesday, 16 August 2022

83 चित्रपटाचा संदेश...



        

     प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा होत असते..जसे भारताने १९८३ सालाच विश्वकप जिंकने होय. कोणाच्याही ध्यानी ना मनी. पण कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने ते करून दाखवले.

        स्वातंत्र्या नंतर विश्वचषकावर भारताच्या विजयाची मोहोर🇮🇳 उमटवली गेली..सोयी, साधने मुबलक प्रमाणात नसताना जिदीच्या आणि स्वाभिमाना च्या जोरावर ते सिध्द झाले..

        चित्रपटामध्ये अशे अनेक धडे आहेत जे आपल्याला उपयोगी पडू शकतील... अनेक खेळाडूंनी भारतीय खेळाडू ची खिल्ली उडवलेली होती.. निवड करणाऱ्या समितीलाही विश्वास नव्हता. तरी पण न डगमगता स्वतःच्या मनगटाच्या जोरावर विजयाला गवसणी घातली .उत्तम नेतृत्व लाभले की यश नक्कीच मिळते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कपिल देव यांच्या संघाचं यश .

  वेस्ट इंडीज सारख्या बलाढ्य संघाला हरवण्याचा विचार ही कोणी करू शकत नव्हता... त्याकाळचे नावजलेले खेळाडू या संघात होते.तरी सुद्धा आशावादी राहून गतविजेत्या संघाला धूळ चारली.

  अनेक सुविधांची वानवा, विमानाच्या तिकीटासाठी साठी पैसे जमवताना तारांबळ होत असे. तरीसुद्धा फक्त देशप्रेम उराशी बाळगून. देशासाठी सर्वस्व पणाला लावून, खेळाडूंनी यशस्वीरीतीने खिंड लढवली .या विजयाने क्रिकेट च्या विक्रमाची सुरवात झाली.. पुढे याची परिणीती आपण 2008 T 20,2011 विश्वकप,🏆🏆🏆 जिंकू शकलो..  क्रिकेट क्षेत्रातील भारताची घोडदौड सुरू झाली.

 निश्चितच चित्रपटाने त्याकाळचे दर्शन झाले आहे. अनेक युवकांना प्रेरणा मिळेल. जिद्द,चिकाटी आत्मविश्वास,मेहनत याच्या आधारे कोणतीही असाध्य वाटणारी गोष्ट शक्य आहे हे प्रकर्षाने जाणवते. चित्रपटामध्ये प्रेरणा देणारी गाणी आहेत.. "लेहरा दो " हे गीत तर ऐकल्यावर तर उत्साह द्विगुणत होतो.. रणबीर सिंग ने कपिल देव यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.अजून बऱ्याच गोष्टी कळणे गरजेचे होते,मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेता ते शक्य नसते झाले. कबीर खान दिग्दर्शत चित्रपटाने भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे.. सर्व कलाकारांचे मनापासून आभार त्यांच्या समर्पणवृत्ती शिवाय हे शक्य झाले नसते...🙏🙏🙏



प्रलय भारत सावंत

१७ऑगस्ट २०२२

Monday, 15 August 2022

स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी पर्व......

           

     Image   Source Google 
            

                                                         शस्त्रे हिचा छेद करू शकत नाहीत

                                                        अग्नी तिचे दहन करू शकत नाही

                                                            पर्जन्याने ती आर्द्र होत नाही 

                                                     आणि वादळाने ही नम्र होत नाही

                                                            आमची स्वातंत्र्यांकाक्षा

                                                             - समिधा कवितासंग्रह   

   

           अशाच स्वतंत्र्याच्या आकांशाने पेटून उठलेल्या स्वांतत्र्यसैनिकांच्या असीम देशभक्ती , त्यागामुळे, बलिदानामुळे आपण १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालो. नव्याने जन्माला आलेल्या राष्ट्रा पुढे अनेक आव्हाने होती.. राष्ट्र उभारणी, संसदीय लोकशाही व्यवस्थेचा विकास, अप्रगत शेती, आरोग्याच्या समस्या,गरिबी ,पायाभूत सुविधांचा अल्पविकास इत्यादि आव्हाने होती.. तथापि आपल्या देशाने सर्व आव्हानांना तोंड देऊन विकासाची पायवाटच काबीज केली आहे .

वाटचाल विकासाच्या दिशेने 

       १९४७ ते २०२२आपला भारत विकासाच्या मार्गावर अविरत चालत आहे... एक वेळ अशी होती की उपासमारी, अन्न धान्याच्या तुटवडा होतो..आज मात्र आपण हरित क्रांती नंतर अन्नधान्याच्या बाबतीत स्वयं पूर्ण बनलो आहोत. कृषी क्षेत्रात आपण उलेखणीय प्रगती केली आहे.आज आपण प्रमुख निर्यातदाराच्या रांगेत स्थान मिळवले आहे. अन्न धान्य यांचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहे.आरोग्य च्या स्थितीत सुधारणा झाली आहे.. माता मृत्यू दर, बालमृत्यू, वर नियंत्रण मिळवण्यास यश येत आहे.करोनाचे संकट काळात लस निर्माण करून जगासमोर एक आदर्श उभा केला आहे . 

         औषध निर्माण क्षेत्रांमधील प्रगती अचंबित करणारी आहे . भारतीय औषधे उत्तम गुणवत्ता आणि किफायतशीर दर यामुळे जगभर प्रसिद्ध आहेत.. विषेतः आफ्रिकन देशांमध्ये खूप मागणी आहे.. करोना वरील स्वदेशी लस, विक्रमी काळात करोडो लोकांचे लसीकरण हे त्यांचे उदाहरण आहे. वैदकिय शिक्षणाचा प्रसार झाल्यानेच हे शक्य झाले.

  शिक्षण

       शिक्षण क्षेत्रात सुध्दा भारत मागे नाही.. भारतीय विद्यार्थी यांना जगभर मागणी आहे.. शिक्षणाचा प्रसार आता मोठ्या प्रमाणात झाला आहे.. काळानुरूप बदल म्हणून नवे शैक्षणिक धोरण 2020 स्वीकारले आहे.भारतीय विद्यार्थ्यानी प्रत्येक क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे... आयटी सेक्टर मध्ये तर भारत अग्रेसर आहे . भारतीय अभियंत्यांना जगभर मागणी आहे. सावित्रीच्या लेकी सुद्धा यामध्ये आघाडीवर आहेत. या सर्वांसाठी राष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनावे लागते. ऊर्जा सुरक्षा ही राष्ट्राच्या प्रगती साठी महत्वाची असते.. अणू ऊर्जा,पवन ऊर्जा,सौर ऊर्जा, जलविद्युत निर्मिती मध्ये आपण वेगाने प्रगती करत आहोत ..

  स्पेस क्षेत्रातील घोड़दौड़  

भारताची प्रमुख अवकाश संशोधन संस्था इस्रो ने अवकाश क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करून भारताच्या विकासात कळीची भूमिका बजावली आहे.डॉ विक्रम साराभाई. डॉ अब्दुल कलाम यांच्या सारख्या 24 तास देशासाठी झटणाऱ्या वैज्ञानिकांमुळेच हे शक्य झाले आहे.संदेश वहन क्षेत्रातील सुविधा हे त्याचेच अपत्य आहे. विविध क्षेत्रातील माहिती प्रत्येकापर्यंत पोहचू शकली..

क्रीडा क्षेत्रातील कामगिरी आणि भारतीय क्रीडा संस्कृती

      हॉकी मधील 8 सुवर्ण, क्रिकेट मधील 2 विश्वकप, एक T 20 विश्वकप ,ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदके. कॉमन वेल्थ गेम्स मधील कामगिरी ही भारतीयांची क्रीडा क्षेत्रामधील प्रगती दर्शवते.. कपिल देव, सचिन तेंडुकर, महेंद्र सिंग धोनी , अभिनव बिंद्रा, पी व्ही सिंधू, नीरज चोप्रा,हिमा दास, मेरी कोम,अविनाश साबळे,इत्यादी सारख्या खेळाडूंनी एक वेगळी छाप पाडली आहे.. विरोधी संघाचा पण आदर, पंचाच्या निर्णयाचा आदर , खेळाडू वृत्ती दाखवून भारतीय खेळाडूंनी नवे मापदंड निर्माण केले आहेत. क्रीडा क्षेत्राला सोनेरी दिवस येत आहेत. 

       आपण सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भरते कडे वळत आहोत..७५ वर्षात आपण वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलो आहोत . यामुळेच आपणास आपल्या विकासाच्या गरजा भागवता येत आहेत.. अर्थिक प्रगती करत असताना आपली संस्कृतीची मुळे अजुन घट्ट आहेत.

संस्कृती 

 विविधतेत एकता हे भारताच बलस्थान आहे. हिमालया पासून कन्याकुमारी पर्यंत, असलेली विविधता भारताचे आकर्षण बनले आहे. अशी ही विविधता इंद्रधनुष्य प्रमाणे उटून दिसत आहे.

विकसनशील देशांचे नेतृत्व

       भारतीय लोकशाही व्यवस्था सक्षमरीत्या भारतीय संविधाना मुळे तग धरू शकली.. लोकशाही मुळेच विविध धर्म ,संस्कृती,असून सुधा प्रत्येकाला प्रगती करण्याची संधी मिळाली आहे.. भारतीय संविधानामुळे हे शक्य झाले.. आपल्या सोबत स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये आज अराजकता आली आले.. श्रीलंका, म्यानमार मधील स्थिती आपणास सर्वश्रुत आहेच.  याच कारणास्तव विकसन शील देश भारताकडे मोठ्या आकांशेने बघत आहेत. त्यामुळेच आपण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी राहिलो पाहिजे 

        प्रगतीपथावर आरूढ होत असताना काही भागात काही कारणास्त विकासाची किरणे पोहचू शकली नाहीत त्यामुळेच प्रत्येक भारतीया पर्यन्त ही किरणे पोहचवून त्यांच्या आयुष्यात आनंदाचा सूर्योदय होईल,. यासाठी प्रत्येक भारतीयांनी कटिबध्द असले पाहिजे.

स्वतंत्र भारताच्या नागरिकांची जवाबदारी

        मदर तेरेसा यांनी एके ठिकाणी म्हंटले आहे की : प्रत्येकाने आपल्या दारासमोरचा कचरा जरी काढला तरी सगळं जग स्वच्छ होऊन जाईल. त्यामुळे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे की त्यांनी स्वच्छ तेच मूल्य जोपासव.. भौतिक स्वच्छते सोबत मानसिक स्वच्छतेची पण गरज आहे.. जातीभेद,भेदभाव, लिंगभेद, वंशभेद, सांप्रदायिकता यांचे उच्चाटन करावे.. माणुसकी , सहिष्णुता , समता ,स्त्री पुरुष,समानता , बंधुभाव, जोपासावी आणि वृध्दींगत करावी...जेणे करून डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे बांधलेला समाज निर्मित होईल.. म्हणूनच म्हणतात "United we stand ,divided we fall " .असा भारत निर्माण करनेच आपल्या स्वातंत्र्य सैनिकाना आदरांजलि असेल. मग,"सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,"असे म्हणताना प्रत्येक भारतीयांच मन भरून येईल.

 जय हिंद!!

©प्रलय भारत सावंत

    १५  ऑगस्ट २०२२ 

   

     

          

      




  

महाड सत्याग्रह २० मार्च १९२७ !!

तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस, एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस ..  महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचल...