Source google
प्रेम फक्त मिळवन नसत,तर प्रेम म्हणजे ऐकमैकाना समजणं असत. सोबत नसताना सुधा तिचां सहवास म्हणजे प्रेम होय. आपल्या जोडीदाराच्या डोळ्यात बघितल्यावर एकमेकांना मिळणार समाधान म्हणजे प्रेम असते.अशाच प्रेमाचं दाखला आपणाला सीता राम या चित्रपटातून मिळतो.
प्रेंम निर्माण होण्यासाठी एक लम्हा गरजेचा असतो. तो लम्हा राम आपले कर्तव्य बजवताना सीतामहालक्ष्मी च्या आयुष्यात येतो . नकळतच ती रामच्या प्रेमात अडकत जाते..पत्र व्यवहार ते भेटी गाठी असा प्रेमाचा प्रवास(हैदरााबाद ते काश्मीर) दोंघांच्या नात्याबदल आदर निर्माण करतो.
धार्मिक बंधन न जुमानता आपली प्रिन्सेस नूरजहान (सीतामहालक्ष्मी) रामच्यां प्रेमात पडते.. आपल्या भावाला न घाबरता तिचे राम वरचे प्रेम कबूल करते.प्रेमाला कोणताही धर्म,जात नसते ही बाब प्रकर्षाने दाखवली आहे.
Source google
प्रेमाची भाषा फक्त जोडीदार पूर्ती मर्यादित न ठेवता बहिणीच प्रेम सुधा एका विलक्षण प्रकारे दाखवले आहे . आपण अनाथ आहे असं जेव्हा राम radio वर सांगतो तेव्हा सर्व देश भरातून त्याला पत्र येतात.. शुभांगी नावाची स्त्री त्याला बहीण म्हणून पत्र लिहते.
सुट्टीत तो तिला आवर्जून भेटायला येतो..ती सेक्स वर्क मध्ये अडकली असून सुधा राम तिचा बहीण म्हणून स्वीकार करतो.तिच्या सोबतच्या सर्व जनीची सुटका राम करतो . या संकटातून त्रासातून मुक्त करतो त्या साठी आपली सर्व जमा पुंजी खर्च करतो.
प्रेम या भावनेत मातृभूमी 🇮🇳चे प्रेम पण अगत्याने आलेच ..आपल्या भारत मातेसाठी आपल्या प्रेमाला पण त्याग करायची तयारी राम दाखवतो...आणि आपल्या असीम देशभक्ति चा मापदंड निर्माण करतों..
आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तो पाकिस्तान मध्ये भारत विरोधी कारवाई करणाऱ्या म्होरक्याला मारण्यासाठी जातो. मिशन पूर्ण झाले होते तरी एका लहान मुलीला आगीतून वाचवण्यासाठी तो थांबतो.आणि तिला सुखरूप बाहेर काढतो.पण दुर्दैवाने कॅप्टन राम पाकिस्तानच्या लष्कराच्या हाथी सापडतो..
मग तुरुंगातच आपल्या मातृ भुमिसाठी कोणतीही तडजोड न करता राहतो. इथे नूरजहान पण राम ची वाट पाहते.. अस वाट पाहण्यात सुधा प्रेम असते .ती त्याची आयुष्भर वाट पाहते....
सर्व कलाकारांनी पात्राला न्याय दिला आहे.त्यांचे मनापासून आभार 🙏🙏🙏.मृणाल ठाकूर (नूरजहान/ सीता ), डी सलमान(कॅप्टन राम ) यांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळते... कॅप्टन राम चा निरागस पणा मनाला भावतो..नूरजहान चे राम बदल चे प्रेम ,तिचा प्रिन्सेस असुन सुध्दा साधेपणा तिच्या बदल आपुलकी निर्माण करते. मानवी कला कृतीचा उत्कृष्ट नमुना म्हंटले तरी वावग ठरणार नाही.. व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्वांना प्रत्येकाला आपली नूरजहाँ आणि आपला राम भेटो अशीच मनोकामना. ....
प्रलय लतिका भारत सावंत
१४ फेब्रुवारी २०२३
.jpeg)
.jpeg)