प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा होत असते..जसे भारताने १९८३ सालाच विश्वकप जिंकने होय. कोणाच्याही ध्यानी ना मनी. पण कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने ते करून दाखवले.
स्वातंत्र्या नंतर विश्वचषकावर भारताच्या विजयाची मोहोर🇮🇳 उमटवली गेली..सोयी, साधने मुबलक प्रमाणात नसताना जिदीच्या आणि स्वाभिमाना च्या जोरावर ते सिध्द झाले..
चित्रपटामध्ये अशे अनेक धडे आहेत जे आपल्याला उपयोगी पडू शकतील... अनेक खेळाडूंनी भारतीय खेळाडू ची खिल्ली उडवलेली होती.. निवड करणाऱ्या समितीलाही विश्वास नव्हता. तरी पण न डगमगता स्वतःच्या मनगटाच्या जोरावर विजयाला गवसणी घातली .उत्तम नेतृत्व लाभले की यश नक्कीच मिळते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कपिल देव यांच्या संघाचं यश .
वेस्ट इंडीज सारख्या बलाढ्य संघाला हरवण्याचा विचार ही कोणी करू शकत नव्हता... त्याकाळचे नावजलेले खेळाडू या संघात होते.तरी सुद्धा आशावादी राहून गतविजेत्या संघाला धूळ चारली.
अनेक सुविधांची वानवा, विमानाच्या तिकीटासाठी साठी पैसे जमवताना तारांबळ होत असे. तरीसुद्धा फक्त देशप्रेम उराशी बाळगून. देशासाठी सर्वस्व पणाला लावून, खेळाडूंनी यशस्वीरीतीने खिंड लढवली .या विजयाने क्रिकेट च्या विक्रमाची सुरवात झाली.. पुढे याची परिणीती आपण 2008 T 20,2011 विश्वकप,🏆🏆🏆 जिंकू शकलो.. क्रिकेट क्षेत्रातील भारताची घोडदौड सुरू झाली.
निश्चितच चित्रपटाने त्याकाळचे दर्शन झाले आहे. अनेक युवकांना प्रेरणा मिळेल. जिद्द,चिकाटी आत्मविश्वास,मेहनत याच्या आधारे कोणतीही असाध्य वाटणारी गोष्ट शक्य आहे हे प्रकर्षाने जाणवते. चित्रपटामध्ये प्रेरणा देणारी गाणी आहेत.. "लेहरा दो " हे गीत तर ऐकल्यावर तर उत्साह द्विगुणत होतो.. रणबीर सिंग ने कपिल देव यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.अजून बऱ्याच गोष्टी कळणे गरजेचे होते,मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेता ते शक्य नसते झाले. कबीर खान दिग्दर्शत चित्रपटाने भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे.. सर्व कलाकारांचे मनापासून आभार त्यांच्या समर्पणवृत्ती शिवाय हे शक्य झाले नसते...🙏🙏🙏
प्रलय भारत सावंत
१७ऑगस्ट २०२२

No comments:
Post a Comment