(Image source google)
शिक्षक दिन आणि आम्ही..
शिक्षक हे राष्ट्राचे सारथी असतात. देशाचे भविष्य घडविण्याची जवाब दारी त्याच्यावर असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुषात शिक्षक,गुरू असतो. आपल्या आई पासून त्याची सुरवात होत असते..मला भाग्य लाभले की माझ्या आयुष्यात बाराखडी ची सुरुवात माझ्या माऊलीनी केली. तीनच शिकवले मला सहनशीलता, जिद्द,त्याग, निःसीम प्रेम!
प्रत्येक व्यक्तीला आयुष्याला कलाटणी देण्याची ताकद शिक्षकात असते.. शिक्षक हे आपल्या आयुष्यासाठी घडवत असतात..मला गृहपाठ वेळेत करायला लावणाऱ्या मॅडम , शाळेत उशीर झाला म्हणून शिक्षा देणारे सर आठवतात. यामुळेच मनावर शिस्त, वक्तशीर पणा या मूल्यांची संस्कार होत गेले .मग आयुष्याच्या शाळेत हीच मूल्ये ,आपण कोणत्याही क्षेत्रात असो यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात निर्णायक ठरतात..मला आठवतं. अभियांत्रिकी कॉलेज मध्ये असताना एके दिवशी प्रिन्सिपॉल डॉ डी.जी.बोरसे सर आले होते ..ते म्हणाले होते. "आम्हाला या कॉलेज मध्ये हिरो नकोत आम्हाला विद्यार्थी हवेत. नंतर हेच विद्यार्थी आपल्या आयुष्यात हिरो बनत असतात.आणि समाजापुढे आदर्श निर्माण करत असतात." . अशी अनेक आयुष्याची समीकरण आपल्याला शिक्षकामुळे उलगडत असतात. मला कौतुकाची थाप देणाऱ्या चव्हाण मॅडम, गुणवत्ता यादीत आल्यावर गुणपत्र सजवणाऱ्या घोडके मॅडम, चुकल्यावर छडी मारनाऱ्या कुंभार मॅडम( कारण छडी लागे छम छम,विद्या येई घम घम).. अशी शिक्षकांची यादीच डोळ्या पुढे उभी राहते.. शिक्षक हे उत्प्रेकाची भूमिका बजावत असतात. म्हणूनच विद्यार्थ्याचा प्रगतीला गती येत असते .
शिक्षक( शि शिलवान ,क्ष क्षमशील ,क कर्तुत्व वान ) या गुणांचा मिलाफ असणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. गुरूचा आदर प्रत्येक संस्कृतीमध्ये केला जातो...
विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन !
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते !!
एका राजाची आणि विद्वानांची तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण राजा हा त्याच्या राज्यात पुजला जातो.मात्र विद्वान हे सर्वत्र पूजनीय असतात..
दुसऱ्या व्यक्तीला मोठ करण्याची आणि मोठ होताना बघण्याची हिम्मत ही काही जणातच असते. ही हिम्मत शिक्षकात असते .शिक्षक गण हे निस्वार्थ ज्ञानदान करणारे असतात.. भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्री बाई फुले हे त्या पैकीच एक होय . हे भारताला लाभलेलं महान शिक्षक . त्यामुळेच आपण सर्व जण विकसित भारताचे स्वप्न पाहत आहोत आणि प्रत्येक क्षेत्रात आपली घोडदौड चालू आहे.
प्रत्येक व्यक्ती चया अंगी उपजत गुण असतात.. प्रत्येकातील गुण ओळखून त्याला चालना देण्याचे काम शिक्षक करत असतात.. प्राचीन काळापासून हे महान कार्य अविरत चालू आहे .
सॉक्रेट्स नावाचा शिक्षक विद्यर्थ्यांना विचार करायला शिकवतो, चार्वाक तत्त्वज्ञ बुध्दी प्रामाण्य वादाचां पुरस्कार करतो , बुद्ध स्वयं प्रकाशित व्हायला शिकवतात...अशा अनेकांची इतिहासाने दखल घेतली आहे.
आजच्या भौतिक वादी जीवनात भावनिक गुंतागुंत वाढत चालली आहे . डिजिटल युगात तर शिक्षकाची भूमिका पुन्हा अधोरिखित झाली आहे.. माहितीचा भडिमार होत आहे. आज सोबत जरी इंटरनेट असला तरी तो माहिती देऊ शकतो..स्वप्न दाखवू शकत नाही. ही भुमिका शिक्षकच लीलया पार पाडतात .
व्यक्तीच्या जडण घडण होत असताना संवाद गरजेचां असतो , विचारांची देवाण घेवाण होणे महत्वाचे असते शालेय जीवनात विचारांना अंकुर फुटत असतो. त्याला योग्य खत पाणी हे आपले शिक्षक घालत असतात .. त्यामुळेच समाजात ज्ञानरूपी मळा हा बहरत असतो. आणि या मल्याची फळे प्रत्येक जन विकासाच्या , सुधारणेच्या ,सुशासनच्यां रुपात चाकत असतो.
अशा प्रकारे शिक्षक ही राष्ट्राची सेवाच करत असतात..
अशा सर्व शिक्षकाना शिक्षक दिना निमित शतश: नमन🙏🙏🙏
प्रलय लतिका भारत सावंत
(५ सप्टेंबर २०२४)
.jpeg)
No comments:
Post a Comment