विज्ञानाच्या अमर्याद सीमा....
"कल्पना शक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची असते कारण ज्ञान हे मर्यादित असते मात्र कल्पनाशक्ती संपूर्ण विश्वाला कवेत घेते. "
- अल्बर्ट आइ्स्टाइन विज्ञान आणि माणूस याचे फार पुर्वी पासूनचे नातं आहे. अगदी दगड गोटे घासून अग्नि निर्माण करण्यापासून ते शेती करण्या पर्यंत , लोखंडा आणि तांबे या धातूच वापर करण्यापर्यंत. माणसाच्या उत्क्रांती मधे अजुनही विज्ञान आपली भूमिका बजावत आहे..जस जसे नवीन शोध लागत गेले तसे माणसाचे आयुष्य गतिमानतेने आणि नविण्यातेने व्यापून गेले आहे. जसे चाकाचा शोध. ते अगदी कॉम्प्युटर, मोबाईल चा शोध. कल्पना आणि शोध जर या शोधांचा विचार केला तर. संशोधकाला सुरवातीला या सर्व आभासी कल्पनाच वाटत होत्या.. जसे राइट बंधूंनी माणसाला ही पक्षांप्रमाणे उडता येईल का ? अशी कल्पनाच केली होती. अगदी माणसं सारखं हुबेहूब यंत्र बनवता येईल का ? माणसाला ही पृथ्वीच्या बाहेर जाता येईल का ?या साऱ्या ज्ञानाच्या पलीकडच्या गोष्टी होत्या.. मात्र या सर्व सत्यात येऊ शकल्या फक्त कल्पना शक्ती च्या जोरावर.. निसर्ग आणि विज्ञान निसर्गाचा आणि विज्ञानाचा घनिष्ट संबंध आहे.. निसर्गातील शक्तींचा शोध घेणं यातूनच संशोधन वृत्ती बळावली.. निसर्गात अजुनही अनेक गुपीत दडली आहेत. नुकतेच गुरुत्वाकर्षण तरंग वैज्ञानिकानी शोधली आहेत , ज्याच भाकीत आइन्स्टाइन ने शंभर वर्षापूर्वी केले होते.. अशी विश्वाची अनेक समीकरण आहेत जी अजून उलगडायची आहेत.. म्हणून वैज्ञानिक दिवसरात्र झटत आहेत. जिज्ञासू वृतीच महत्त्व. आपल्याला प्रश्न पडायला हवेत..जसा प्रश्न महान वैज्ञानिक न्यूटन यांना पडला होता की, सफरचंद झाडावरून खालीच का पडते?. नोबल विजेते भारतीय डॉ सी वी रमण यांना पडला.. की आकाशात असे रंग का बर दिसतात? त्यातूनच न्यूटनला गुरुत्वाकर्षण चा आणि डॉ रमण याना रमण परिणामाचा शोध लागला.
गरज आणि कल्पनाशक्ती गरज ही शोधाची जननी आहे. अनेक शोध हे माणसाच्या गरजेमुळेच लागले आहेत.. ग्राहम बेल.यानी फोनचा शोध लावला..पण खर तर ते आपल्या पत्नी साठी(जिला ऐकू येत नव्हते ) ऐकू येणारी मशीन बनवत होते. मात्र त्यांच्या प्रयत्नातून फोन चा शोध लागला.. कल्पनाना प्रयोगाची जोड विज्ञानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे कल्पनांना प्रयोगाची जोड . आणि जो पर्यन्त प्रयोगानी पडताळणी होत नाही तो पर्यंत त्याचा स्वीकार न करणे.. अशी ही विज्ञानाची किमया आहे .म्हणूनच आपले वैज्ञानिक धोरण मांडताना पंडित नेहरूंनी खालील उदगार काढले होते, "विज्ञानच भारताला गरिबी,उपासमारी,अंधश्रद्धा, रोगराई यातून मुक्त करेल.." पुढे हेच विधान अनेक वैज्ञानिकांनी खरे ठरवले. डॉ होमी भाभा यांनी अणू ऊर्जा क्षेत्रात, डॉ स्वामिनाथन यांनी हरिक्रांती करून भारताला अन्न धान्य मधे समृद्ध बनवले. आणि भारत स्वावलंबी बनला. डॉ विक्रम साराभाई, डॉ सतीश धवन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी अंतराळ क्षेत्रात भारताला भरारी घेण्यासाठी अद्वितीय कामगिरी केली.पुढे डॉ नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रधेच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी अंध श्रद्धा निर्मूलन समिती मार्फत लढा उभारला.. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी आपल्या देशाला विवेकवाद, समृध्दी, स्वावलंबन अशा वाटेवर चालण्यास अमूल्य योगदान दिले आहे . ही मूल्ये आणि मानवाचा प्रवास निश्चितच आपल्याला सर्व समावेशकतेकडे नेण्यास प्रमुख भूमिका बजावतील. (माझ्या आयुष्यात पुन्हा शिकण्याची संधी जिच्या मुळे मला लाभली त्या आमच्या दीदी च्या स्मृतीला हा लेख अर्पण) ©प्रलय भारत सावंत १६-०७-२०२१

तुकाराम महाराजांची कल्पनाशक्ती
ReplyDelete'अणू रेणूया थोकडा
तुका आकाशा ऐवढा'
🙏🙏🙏 thanks sir for your time and valuable comment
Deleteकल्पना या वास्तवामध्ये फक्त झपाटलेल्या जिज्ञासु वृत्तीने विज्ञान प्रत्यक्षात खरं करून दाखवते.
ReplyDeleteअगदी परिपूर्ण लेख..👍👌
Thanks saheb, 🙏🙏🙏
Delete👍
ReplyDeleteThanks 🙏🙏🙏
Delete